गुरुपौर्णिमेनिमित्त सेवाभावी प्रतिष्ठान तर्फपरिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ले.

तळोदा – गुरुपौर्णिमेच्या  साधून भारतात पूर्वीपासून सुरू असलेली गुरु शिष्याचे परंपरानुसार या परंपरेचा एक भाग “जो अनपढ हे उन्हे पढाई” हे ब्रीदवाक्य मनात घेऊन सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा तर्फे तुळाजा गावात परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद तुळाजा चे मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला बागुल मॅडम होते.

भारत माता यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आला. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रस्तावना श्री.माधव पावरा यांनी केले.

या वेळेस जिल्हा परिषद तुळाजाचे शिक्षक श्री.दीपक पाटील सर म्हणाले की, गुरु शिष्य ही परंपरा खूप जुनी आहे भारत देश सोडला की इतर ठिकाणी टीचर्स अँड स्टूडेंट ही संकल्पना आहे गुरु हा योग्य मार्गदर्शक करत असतो मी सेवाभावे प्रतिष्ठानचे मी कार्याला जाणून आहे सेवाभावे प्रतिष्ठान ही संस्था वृक्षारोपण, आपत्काल च्या वेळी ऊसतोड मजुरांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देणे त्यांचे वाचनालय व विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी व्हावी म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे होय असे वेगवेगळे उपक्रम सेवाभावे करत राहते.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद, तुळाजा शिक्षक श्री. राजेंद्र पाडवी सर, श्री. धरमदास वसावे सर, श्री दीपक पाटील सर, श्री अमरसिंग वसावे सर हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे, कार्याध्यक्ष संतोष जगत चौधरी ,उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव कविता दिलीप कलाल,संचालक नकुल दित्या ठाकरे,श्री.अतुल भिमसिंग पाटील, दिवाण पावरा यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे आभार सेवाभावे प्रतिष्ठानचे श्री.मनीलाल खर्डे यांनी मानले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh