मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव महापालिकेत धमाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जळगावला येणार आहेत.

जळगाव – याबाबत त्यांनी आश्‍वासन दिले असल्याची माहिती नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली. त्यामुळे जळगाव महापालिकेतील शिवसेनेची सत्ता टिकणार की जाणार याबाबत अनिश्चितता वाढली आहे.

महापालिकेच्या काही नगरसेवकांनी बुधवारी (ता. १३) ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेला २७ नगरसेवकांचा गट आहे. त्यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपची सत्ता खालसा होऊन शिवसेनेची सत्ता स्थापन झाली होती. आता याच नगरसेवकांतील काही जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील पाच जणांनी बुधवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यात ॲड. दिलीप पोकळे, चेतन सनकत, नगरसेविका प्रतिभा देशमुख यांचे पती गजानन देशमुख, नगरसेविका रेश्‍मा काळे यांचे पती कुंदन काळे यांचा समावेश होता.

याबाबत नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी सांगितले, की महापालिकेत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात अगोदरच प्रवेश केला आहे. यापूर्वी आमच्या काही नगरसेवकांनी भेट घेतली होती. बुधवारी आम्ही चार नगरसेवक भेट घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमास भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

नगरसेवक पुढे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांना आम्ही जळगावच्या प्रश्‍नाबाबत सांगितले असता त्यांनी जळगाव शहराच्या विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढणार आहोत. आवश्‍यक तेवढा निधी आपण देणार आहोत. तसेच जळगाव शहराला आपण लवकरच भेट देणार असल्याचेही सांगितले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh