कोचिंग क्लास मधील शिक्षकाचं हडळ कृत्य,मारहाणीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद.

कोचिंग क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकानं अमानुष मारहाण केली. ही मारहाण इतकी संतापजनक होती, की या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गावातल्या लोकांनी कोचिंग क्लासमधील शिक्षकालाच नंतर बदडून काढला.

कोचिंग क्लासमध्ये एका वर्गात हा शिक्षक इतर मुलांच्या देखत एका पाच वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला. शिक्षकाचे फटके खात असताना हा विद्यार्थी कळवळत होता. त्याच्या किंचाळणं काळीज पिळवटून टाकणारं होतं लाकडाच्या फळीने एकामागोमाग एक फटके या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर लगावले. शिक्षकाच्या जोरदार प्रहारानं विद्यार्थी कळवळू लागला. रडू लागला. पण शिक्षकानं मारहाण करणं काही थांबवलं नाही. इतकाच काय, तर नंतर काठी ठेवून हाताने मुलाच्या कानशिलातही शिक्षकाने लगावली. त्याने हा विद्यार्थी फरशीवर कोसळला.

यानंतरही शिक्षक थांबला नाही. विद्यार्थ्याच्या पाठीतही शिक्षकाने बुक्के घातले. हा सगळा प्रकार वर्गातील मुलांच्या देखतच सुरु होता. तर वर्गाच्या दरवाजात उभ्या असलेल्या एकानं चोरुन ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

हा मुलगा बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकाने त्याला जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ नंतर व्हायरल झाला. त्यानंतर या कोचिंग क्लासमधील शिक्षकाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिक्षकाने केलेल्या या जबर मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. कसंबसं करुन विद्यार्थ्याने जीव वाचण्याच्या इराद्याने वर्गातून पळ काढला.

नेमकी कुठे घडली घटना?

ही धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली. बिहारच्या पाटणामधील धनरुआ इथं ही भयंकर घटनी घडली होती. जया क्लासेसमध्ये शालेय विद्यार्थ्यांची आणि सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जाते. शनिवारी छोटू नावाच्या एका शिक्षकाला एका शुल्लक कारणावरुन राग आला. विद्यार्थ्यावर आलेला राग या शिक्षकानं इतक्या भयंकर पद्धतीनं व्यक्त केला, की वर्गातील सगळेच विद्यार्थी हादरुन गेले होते.

शिक्षकाला ग्रामस्थांची मारहाण

विद्यार्थ्याला मारहाण करणारा हा शिक्षक शॉर्ट टेम्पर्ट होता. त्यानं केलेलं कृत्य गावातील लोकांना कळल्यानंतर स्थानिकांनी या शिक्षकाला चोपून काढलं. यानंतर मारहाणी दरम्यान, कसाबसा पळ काढत या शिक्षकानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. अखेर आता याप्रकरणी पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार शिक्षकाचा शोध घेतला जातोय. तर ज्या क्लासमध्ये हा शिक्षक शिकवत होता, तिथूनही त्याला काढून काढण्यात आलंय.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला