ममुराबाद– : येथे सन २०१९ मध्ये ग्रामपंचयातीने ग्रामसभा बोलावुन त्या ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अतिक्रमणा बाबात कोणत्याच प्रकारची चौकशी न करता ग्रामसभेच्या ठरावामध्ये २०१० पुर्वीचे अतिक्रमण धारकांना डावलुन. दोन तीन वर्षापासुन केलेल्या अतिक्रमण धारकांची नावे ग्रामसभेमध्ये घेण्यात आली. त्यानंतर २०१० पुर्विच्या च्या अतिक्रमण धारकांनी ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ घातल्याने सदर अतिक्रमण नियमानुकुल करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती.
परंतु आता विद्यमान सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी २०१९ च्या ग्रामसभेमध्ये नियमबाह्य तयार करण्यात आलेल्या अतिक्रमण धारकांची यादी वरिष्ठ कार्यालया कडे नियमानुकुल करण्यासाठी पाठवण्यात आली आहे. सदर यादी हि बोगस व नियमबाह्य झाल्याने गावी असलेले खरे अतिक्रमण धारक मात्र या लाभा पासुन वंचित राहणार आहे.
गावी सन २०१९ मध्ये झालेल्या ग्रामसभे मध्ये जवळपास ११९ (एकशे एकोनावीस) अतिक्रमण धारकांची नावे नोंद केलेली आहे. त्यांनंतर सन २०२२ मध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये सुध्दा जवळपास ६० ते ७० बोगस अतिक्रमण धारकांची नावे सरपंच तथा काही सदस्य यांनी घेतलेले आहे. सदर अतिक्रमणाची सखोल चौकशी करण्यात यावी.कारण सदरचे अतिक्रमण रद्द न झाल्यास भविष्यात रहदारीला मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी सदर अतिक्रमणा बाबत सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा.आपल्या कार्यालयाकडे नियमित करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण धारकांच्या नावांची चौकशी व्हावी व जे अतिक्रमण धारकांनी २०१० पुर्वी अतिक्रमण केले असेल अशाच अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमित करावे.
त्याचप्रमाणे शासणाच्या अतिक्रमण नियमित करण्याच्या वेबसाईटवर अतिक्रमण धारकांची नावे नोंदवण्यात यावी अशी मागणी विजय सोनवणे यांनी म.जिल्हाधिकारी,म.उपविभागीय अधिकारी, म.मुख्य कार्यकारी अधिकारी म.तहसिलदार. म गटविकास अधिकारी, यांचेकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे.