महेंद्र सोनवणे
ममुराबाद -:अक्षय तृतीया निमित्त वर्षानुवर्ष चालत आलेल्या बारा गाड्यांचा कार्यक्रम आज दिनांक 3 मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शांततेत पार पडला. याबाबत सविस्तर वृत्त असे की मुमराबाद येथे अक्षय तृतीया निमित्त मरी मातेच्या बारागाड्या ओढण्यात आल्या बारागाड्यांचा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
साधारण दोन ते अडीच वर्षापासून पूर्ण जगात कोरोणाने थैमान घातले होते. त्यामुळे सर्व सण उत्सवांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु कोरोनाचा धोखा पूर्णता कमी झाल्याने शासनाने लावलेली निर्बंध उठवण्यात आल्याने बारागाड्यां ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संतोष पवार यांना बारागाड्या ओढण्याचा मान देण्यात आला त्यांच्यासोबत चावदस चौधरी. गोरख पाटील, भगत मुरलीधर पाटील, मधुकर पाटील, बापू भील, रघु सावळे, त्याच बरोबर राजू लटकन पाटील, सुरेश पाटील, छन्नु कोळी, लोटन पाटील, गोपाल मोरे, यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमावेळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी गर्दीला पांगवण्यासाठी व कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बारा गाड्यांची सुरुवात असोदा त्यावरून करण्यात आली तर सांगता कानळदा रस्त्यावर गावहाळ जवळ करण्यात आली.यावेळी बारागाड्यांचा रस्ता मोकळा करण्यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी परिश्रम घेतले.
ग्राम सुरक्षा रक्षकांनी केले सहकार्य
गावी स्थापन करण्यात आलेल्या ग्राम सुरक्षा रक्षक दल समिती च्या सुरक्षा रक्षकांना पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते टी-शर्ट चे वाटप करण्यात आले.यावेळी ग्राम सुरक्षा रक्षकाची गावी नेमनुक का केली जाते त्यांनी कशाप्रकारे काम करावे याबाबत देखील त्यांना कुंभार यांनी मार्गदर्शन करण्यात आले.