यावल अमीर पटेल
yawal-ओला व सुका घन कचरा संकलन करून वाहतूक करण्याचा ठेका यावल नगरपालिकेतर्फे एका ठेकेदाराला देण्यात आला आहे, ठेकेदाराचे स्थानिक कर्मचारी मात्र ओला व सुका घनकचरा दररोज संकलित न करता एक दिवसाआड़ किव्वा दोन दिवस आड आणि ते सुद्धा अवेळी, अनियमित संकलित करून सोयीनुसार वाहतूक करीत असल्याने तसेच घंटागाडीचा आवाज(घनकचरा संकलन करण्याची रेकॉर्डिंग)बंद असल्याने नागरिकांना समजून येत नसल्याने यावलकर संभ्रमात पडले असून ठेकेदाराची मात्र चांदी होत आहे, याकडे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी लक्ष केंद्रित करून ठेकेदारावर कार्यवाही करून पेमेंटची कपात करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरातील ओला व सुका घन कचरा वाहतूक करण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या बाहेरील एका ठेकेदाराला देण्यात आला आहे,परंतु प्रत्यक्ष काम मात्र स्थानिक काही ठेकेदार करीत असून या दुर्गंधीयुक्त ओला व सुका घन कचऱ्यातील टक्केवारी मनसोक्त खात असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे. ठेकेदाराकडून नागरिकांच्या माहितीसाठी घंटागाडीवर ओला व सुका घन कचरा संकलित करण्यासाठी जाहीर दवंडी प्रसिद्धीसाठी घंटागाडीवर देण्यात येणारे पेन ड्राइव आणि स्पीकर बंद असल्याने नागरिकांना समजून येत नसल्याने नागरिक संभ्रमात पडले असून ओला व सुका घनकचरा वाहतुकीसाठी ठेकेदाराने कचरा वाहतुकीची वाहने सुद्धा कमी आणलेली असल्याने प्रत्येक प्रभागात ती वाहने वेळेवर आणि नियमित पोचत नसल्याने स्थानिक ठेकेदार एक किव्वा दोन दिवसा शहरातील कचरा सोयीनुसार संकलित करीत असल्याने यावल करांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित ठेकेदार ओला व सुका घन कचरा यावल नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या अटी शर्ती नुसारच वाहतूक करीत आहे किंवा नाही? ठेकेदार घनकचरा मोजताना वजन काट्यावर जात असताना पुन्हा पुन्हा त्याच वाहनांचे वजन काट्यावर वजन माप करून यावल नगरपरिषदेची आर्थिक फसवणूक करीत आहे का? ठेकेदार जवळ घनकचरा वाहतुकीची वाहने पूर्ण आहेत किंवा नाही?घनकचरा दररोज संकलित केला जात आहे किंवा नाही?याची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी ठेकेदाराचे बिल कपात करून कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.