ममुराबाद ग्रामपंचायतीला वाळु चोरी प्रकरणी 2,33,668, रुपये दंडाची नोटीस.. सरकारी बांधकामांसाठी होतेय यंत्रणेकडूनच गौण खनिज चोरी

बांधकामांसाठी होतेय यंत्रणेकडूनच गौण खनिज चोरी गौणखनिजाचे ऑडिट जिल्हा खनिकर्म विभागाने सुरू केले असले तरी ममुराबाद ग्राम पंचायत वगळता एकाही ठिकाणी अद्याप कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. पंतप्रधान सडक योजना, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महापालिका, ग्रामपंचायती तसेच लघुसिंचन विभागाने केलेल्या बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा वापर झाला आहे व सुरु देखील आहे. ऑडिट केल्यानंतर सरकारी यंत्रणेकडूनच गौण खनिजाची चोरी होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

तालुक्यामध्ये एकाही ठिकाणी कारवाई तर सोडा, पण साधी तपासणीही पथकाकडून झाली नाही. तहसीलदार नामदेव पाटील यांनी ममुराबाद येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये आढळुन आलेल्या 8 ब्रॉस वाळुसाठी 17 मार्च रोजी ग्रामपंचायतीला 2,33,668 रुपयाचा दंड ठोठावला आहे,

शासकीय बांधकामासाठी थेट रेती नदीवरून पुरवठा केल्या जातो. या सर्व प्रकाराची माहिती असूनही महसुलचा एकही अधिकारी,कर्मचारी कारवाई करण्यासाठी धजावत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संबंधित कार्यक्षेत्राच्या तलाठ्यांसोबत मिलीभगत असल्याने कुणालाही कानोकान या प्रकाराची खबर लागत नाही.

गौणखनिजाची चोरी रोखण्यासाठी पथक कार्यान्वित करूण. तहसीलदारांनी कार्यक्षेत्रातील सरकारी बांधकामांचे ऑडिट करावे. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाच्या पावत्या आढळणार नाहीत त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून दंड वसूल करावा.