कानळदा येथे ग्रामपंचायत तर्फे कोविड.१९बाबत जनजागृती.

विजय सपकाळे

कानळदा – ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक 10 -12 – 2021 वार शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 लसी बद्दल सरपंच श्री पुंडलिक तुळशीराम सपकाळे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यात ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आशा वर्कर सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व सहकारी सोसायटी सचिव तलाठी गावातील खाजगी डॉक्टर रेशन दुकानदार व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते त्यात सरपंच यांनी सर्वांना सुचित केले की गावात प्रथम डोस 971 घेण्यात आला असून दुसरा डोस तुलनात्मक दृष्या कमी घेतला जात आहे तरी दोन्ही डोस सर्वांनी घेणे आवश्यक असून शासकीय प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे तसेच शासकीय योजना पासून कुणीही वंचित राहू नये व प्रत्येकाला लस घेण्यास प्रवृत्त करून लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन गावात जनजागृती करण्यात आली तसेच गावात कोविड 19 बाबत आशावरकर यांनी चांगल्या प्रकारे कार्य केले त्याबद्दल सरपंच व सदस्य यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले.