ममुराबाद येथे इनोव्हा गाडीचे टायर फुटल्याने अपघात

ममुराबाद – जळगाव विदगाव रस्त्यावर ममुराबाद गावापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या समर्थ रसवंती जवळ जळगाव कडुन येणार्‍या इनोव्हा कार क्रमांक एम एच ३९ क्यु ८६८६ हिचे टायर फुटल्याने कार उजव्या बाजुला असलेल्या चारीमध्ये उतरल्याने मोठा अपघात झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि आज दिनांक ६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास विदगाव येथील पंचायत समिती सभापती श्री जनार्धन पाटील ( जना आप्पा ) हे आपल्या कारने जळगाव कडुन विदगावला आपल्या घरी येत असतांना इनोव्हा गाडी क्रमांक एम एच ३९ क्यु ८६८६ हिचे पुढील उजव्या बाजुचे टायर फुटल्याने मोठा अपघात झाला सुदैवाने यामध्ये एअर बॅग उघडल्याने कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही.

jalgaonsandesh

jalgaonsandesh