दुसखेडा येथील सरपंचावर कारवाईची मागणी ?

यावल (प्रतिनीधी )पदाचा दुरूपयोग करून ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करणार्‍या सरपंचांवर कारवाई करण्याची मागणी दुसखेडा ग्रामपंचायतीचे उपसरपंचांसह सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचा मुलगा यांनी परस्पर पत्रव्यवहार करून दुसखेडा रेल्वे स्टेशन ऑफिस व क्वार्टर यांना ग्रामपंचायत दुसखेडाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात भुसावळ मध्य रेल्वे इंजिनिअरिंग कार्यालयाला पत्र दिले होते मात्र ग्रामपंचायतला व सदस्यांना विश्वासात न घेता पदाचा दुरुपयोग करून परस्पर पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतचा जादा दराने दरमहा रुपये 25000 दाखवून सरपंचाचे नात्यातील सुनबाई श्रीमती राधा योगराज सोनवणे यांचे नावाने कमी दराने 16 हजार 120 रुपये दरमहा असा करार पाणीपुरवठ्याचा केला. सरपंचाची सुनबाई यांचा दोन वर्षाच्या करार 3 लाख 86 हजार 900 रुपये एवढा होतो हा करार त्यांनी ग्रामपंचायतला अंधारात ठेवून घरात करून घेतला. त्यामुळे ग्रामपंचायत दुसखेडाची 3 लाख 86 हजार 900 रुपये चे आर्थिक नुकसान झाले आहे. यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39 व 178 अन्वये कारवाई होऊन त्यास पदावरून कमी करून ग्रामपंचायतीचे झालेले आर्थिक नुकसान त्यांच्याकडून वसूल करावे, अशी तक्रार ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगन्नाथ धुडकू पाटील, सदस्य सौ जिजाबाई जगन्नाथ पाटील, सुभाष दगडू सोनवणे, सौ कविता सुभाष सोनवणे, सुरेश भागवत ठाकरे, महेंद्र गंगाराम बाऱ्हे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली होती

त्या अनुषंगाने सरपंच सौ लक्ष्मीबाई यशवंत सोनवणे यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे मागणी सदस्यांनी केली आहे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव आणि जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हबीब तडवी यांनी परवा चौकशी केली आता ते नेमके काय अहवाल पाठवतात, सरपंचांवर कारवाई होते किंवा काय? याकडे आता लक्ष लागून आहे

jalgaonsandesh

jalgaonsandesh