विजय सपकाळे
कामळदा -तब्बल दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत.जि.प.शाळा कानळदा(बॉईज) शाळेची घंटा वाजली. *शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स ठेवून सॅनेटाईज करण्यात आले. तापमान मोजण्यात आले. विद्यार्थ्यांचे मास्क व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय शालेय कालावधीत कोरोना नियमांचे पालन करण्यात आले*.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शा. व्य. स. व गावकऱ्यांच्या सहकार्याने शालेय परिसरात मंडपासह खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शा. व्य. स. चे अध्यक्ष,सदस्य,कानळदा सरपंच,ग्रा.प.सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
दोन वर्षानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर श्री.डी बी चव्हाण साहेब व सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक श्री. मुरलीधर पुंडलिक सपकाळे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.