चोपडा महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

हेमकांत गायकवाड

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यायातील विद्यार्थी विकास विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांकडून १८ वर्ष पूर्ण झाल्याबरोबर मतदार यादीत नाव नोंदणी करून घेईल अशी प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच प्रथम वर्ष कला वर्गातील विद्यार्थ्यांकडून १८ वर्ष पूर्ण झाल्याबरोबर मतदार यादीत नाव नोंदणी करून घेणार अशा आशयाचे प्रमाणपत्र भरून घेण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी. डी. कर्दपवार, प्रा. ए. बी. सूर्यवंशी, डॉ. व्ही. आर. कांबळे, सौ. संगीता पाटील, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे, प्रा. बी. एच. देवरे, श्री. राजू निकम, चि. राहुल निकुंभ आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ यांनी केले. तर महाविद्यालय निवडणूक नोडल अधिकारी प्रा. डी. डी. कर्दपवार यांनी विद्यार्थ्यांना निवडणुकीचे महत्त्व सांगून, मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागपत्रांची माहिती देवून मतदार यादीत नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करून घेण्यासाठी प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयीन निवडणूक मंडळ विद्यार्थी अध्यक्ष राहुल निकुंभ यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण पाटील, ज्ञानेश्वर जोशी व इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh