महावितरणने सक्तीची वसुली मोहीम थांबवावी : संदीप पाटील

हेमकांत गायकवाड

वर्डी ,चोपडा : कोरोना सारख्या महाभयंकर संकटात सर्वांना रोजगार मिळवून देणाऱ्या शेती व्यवसायाच्या मुळावर महावितरण कंपनी उठलेली आहे. अन्य उद्योगांवर सवलतीं उधळत असताना कष्टकरी शेतकऱ्यांचे एन रब्बी हंगामात दिवाळीसारख्या पवित्र सणासुदीच्या काळात थकबाकीच्या नावाखाली शेतीपंपाचे कलेक्शन तोडण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाची लाट उसळलेली आहे त्यामुळे दिवाळीपर्यंत कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा व महावितरणने सक्तीची वसुली थांबवावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी इशारा दिला आहे.उत्तर महाराष्ट्र कृषिप्रधान म्हणून राज्यात ओळखला जातो सर्व शेतकऱ्यांचे अर्थचक्र पूर्णपणे शेती व्यवसायावर अवलंबून आहे कोरोणा काळात अर्थ चक्र विस्कळीत झालेले असतानाच अतिवृष्टी गारपीट बेमोसमी पाऊस शेतीमालाला भाव नसणे अशा संकटाच्या मालिकांना तोंड देत शेतकरी काळी आई ची सेवा करत आहे संकटात मदत करत शेती व्यवसाय पुन्हा उभा करत असताना वीज बिलाच्या सक्तीच्या वसुलीमुळे महावितरण कंपनीने कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे हंगामाच्या काळात हेतूपुरस्पर वीज खंडित करण्याचा अन्यायकारक मोहित बंद करणे गरजेचे आहे सरकार अतिवृष्टी ची मदत जाहीर करत नाही पीक विम्याचे पैसे देत नाहीत ज्यांचे झाले आहेत त्यांना वेळेवर पैसे देत नाहीत वरून मंत्री म्हणतात शेतकऱ्याची आम्ही दिवाळी गोड करू मात्र दिवाळी गोड करण्याआधीच महावितरणने सत्तेच्या वसुलीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी कडू केलेली आहे तरी महावितरणने लवकरात लवकर ही मोहीम थांबवावी अन्यथा शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh