दुष्काळात शेतकऱ्यांचे वीज तोडणी थांबवुन शेती पंपाचे वीज बिल माफ करावे व या पुढे इतर राज्यासारख माफ करावे किंवा किमान अश्वशक्ती वर आधारित तरी आकारावे अन्यथा रस्ता रोको…

चोपडा : तालुक्यात वीज वितरण कंपनीने जुन्या थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याचे धोरण अवलंबले आहे. दुष्काळ व नंतर अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल असून रब्बी चांगला हंगामा येण्याच्या आशेने आर्थिक कोंडी झाली असताना वीज जोडणी तोडण्याचे कामकाज सुरु केल्याने शेतकरी संतप्त असून तालुक्यातील शेतकरी संघटना व

राजकीय पक्षांनी २९ रोजी रस्तारोको
करणार आहेत. वीज बिल माफ करावे अशी मागण्याचे निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले. यावेळी एस.बी.पाटील, तुकाराम बाविस्कर, अजित पाटील, शांताराम हिवराये, अनिल वानखेडे, मनोज पाटील, सुशील सोनवणे,महेंद्र पाटील, कुलदिप पाटील, रावसाहेब पाटील, किरण गुर्जर आदी उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh