भारतातील १६२३२ आय आय टी विद्यार्थ्यांमध्ये पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या ४ विद्यार्थ्यांची निवड.

हेमकांत गायकवाड

चोपडा : पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथील इयत्ता बारावीतील ३२ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांनी गणित या विषयांची निवड केली होती .त्यात जे.ई.ई. ॲडव्हान्स मध्ये ओम रामलाल जैन, मयूर ज्ञानेश्वर पाटील, मोहित संजय महाजन , दिया हितेश शहा या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले. आय.आय.टी साठी ते पात्र ठरले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांसह संस्थेच्या वतीने युवा संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या नावलौकिकात मोलाची भर टाकली आहे तसेच संस्थेसाठी सदर विद्यार्थ्यांचे यश अभिमानास्पद आहे असे भैय्यासाहेब पंकज बोरोले यांनी सांगितले.

या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांची मेहनत व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे .या विद्यार्थ्यांना प्राचार्य मिलिंद पाटील, के .पी. पाटील ,किरण चौधरी, चंद्रकांत पाटील, कृष्णा कुमार शुक्ला, इब्राहिम तडवी, कोमल वाघ या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य मिलिंद पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण चौधरी यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष दादासाहेब डॉ. सुरेश बोरोले , उपाध्यक्ष अविनाश राणे यांनी अभिनंदन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

jalgaonsandesh

jalgaonsandesh