महावितरण कंपनीच्या लहरी कारभारामुळे विज तोडणीचे शेतकऱ्यांवर संकट

दिपक नेवे

यावल -विविध गावांमध्ये तसेच चुंचाळे व संपुर्ण परिसरातील शेतीपंपांचा विज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम महावीजवितरण कंपनीने सुरू केली असून आदीच कोरोना महामारीचे संकट त्यानंतर ओढवलेले नैसर्गीक संकट या संकटांच्या चक्रव्यूहतुन अद्याप बाहेर विघालेले नसतांना महावितरण कंपनीचा विज तोडणीचा गोंधळ या सर्व प्रकारामुळे शेतकरी बांधव कमालीचे त्रस्त झाले आहे . महावितरण कंपनीच्या माध्यमातुन परिसरातील बहुतांश ट्रांसफार्मर चे वीज कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे वरील आदेशाप्रमाणे ही कारवाई करत असल्याचे वायरमन शेतकऱ्यांना सांगत असून, मात्र विज कनेक्शन कट झाल्यामुळे शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झालेली आहे गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारीचे महासंकट या मुळे शेती पिकांना योग्य भाव मिळाला नाही व मालाचा उठावही झाला नाही तर यावर्षी सततच्या अवकाळी पावसाने रब्बी व खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतीसाठी लागलेला खर्च ही शेतकऱ्यांचा निघणार नाही अशी परिस्थिती असुन चुंचाळे सह परीसरात केळी,कांदा,मका,कपाशी व भाजीपालासह अनेक पिकांची लागवड असते यावर्षी सततच्या पावसामुळे कांदाबसल्याने लागवड वाया गेली तर केळी मातीमोल भावात जात आहे तरीही केळी कापणीसाठी व्यापारी तयार होत नाहीत व हजोरो क्विंटल केळीचे शेतात नुकासान होत आहे अशी परीस्थीती असतांना शेतकऱ्यांनी मका,कांदा,केळी,भाजीपाला अशी पिके लावलेली आहेत मात्र वीज वितरण कंपणीने वीज कनेक्शन कट केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याही पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे व पीक जळत असून आधी नैसर्गीक आपत्ती आणी आता वीज वितरण कंपणीने शेतीपंपाचे विजकनेक्शन कट करण्याची चालवलेली धडक मोहीम यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असुन विजवितरण कंपणीच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन लवकर योग्यतो मार्ग काढून शेतीपंपाचा विजपुरोवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh