आमदार भीमराव केराम यांचे जन्मगावाकडे दुर्लक्ष मातंग समाजाच्या समशान भूमी ला रस्ता नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

किनवट प्रतिनिधी मारोती देवकते

किनवट पासून 12 किलोमीटर अंतरावर आमदार भीमराव केराम यांचे जन्मगाव चिखली बू गावात मातंगांच्या स्मशान भूमि साठी रस्ता नसल्याने प्रेताचा अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना चक्क नाल्यातून रस्ता काढत ये जा करावे लागते.

चिखली बु गाव हे आमदार भीमराव केराम यांचे जन्मगाव असून मूळ गावाकडे लक्ष देण्या बाबत गावातील नागरिकांनी केराम साहेबांना प्रत्यक्ष दोन वेळा भेटून निवेदन देण्यात आले असल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून प्रतिनिधी जवळ सांगितले. तसेच ग्रामसेवकाशी प्रतिनिधीने संपर्क केला असता ग्रामसेवक म्हणतात मला सुद्धा ही गोष्ट आजच कळाली यावरून शासन व प्रशासन दलितांच्या बाबतीत व त्यांच्या विकासात्मक धोरणाकडे किती जागरूक आहे हे स्पष्टपणे दिसून येते आमदार केराम साहेबांनी जन्म गावाकडे लक्ष देणे सध्या तरी काळाची गगरज आहे. अन्यथा येणाऱ्या काळात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत केराम साहेबांना व गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत शर्तीचे प्रयत्न करावे लागतील हे मात्र निश्चित. वेळीच दखल घेऊन समशान भूमी कडे जाणारा रस्ता न केल्यास येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सुद्धा नागरिकांनी बोलून दाखविले याचे दुष्परिणाम लोकप्रतिनिधींना भोगावे लागतील.