इंदौरमध्ये ‘राजा रघुवंशी स्टाइल’ धमकी प्रकरण! पत्नी आणि प्रियकराने दिली नवऱ्याला ड्रममध्ये टाकण्याची धमकी

इंदौर शहरात राजा रघुवंशी हत्याकांड आणि मेरठचा साहिल मुस्कान प्रकरण यांचा प्रभाव असलेला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यात सध्या तीव्र वाद सुरु असल्याचे उघड झाले आहे. या वादाला कारणीभूत ठरली आहे पत्नीच्या आयुष्यात नव्याने आलेली प्रियकराची एन्ट्री.

पीडित पतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून त्याला ‘राजा रघुवंशी प्रकरणासारखे’ संपवण्याची आणि त्याचे प्रेत निळ्या ड्रममध्ये लपवण्याची धमकी दिली आहे. या धमक्यांमुळे घाबरलेल्या नवऱ्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली व आपले प्राण वाचवण्याची विनंती केली.

हा संपूर्ण प्रकार एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून प्रकरणाची चौकशी आता इंदौर क्राइम ब्रांचच्या देखरेखीखाली सुरू आहे. पोलिसांनी पतीकडून काही महत्वाचे पुरावेही मिळवले आहेत जे त्याच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात आहेत.

पीडित पतीने माध्यमांसमोर येऊन आपली आपबीती सांगितली. “माझ्या पत्नीने मला स्पष्ट सांगितलं की ती मला राजा रघुवंशीप्रमाणे संपवेल आणि माझा मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकेल,” असे त्याने सांगितले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पुढील तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

ताजा खबरें