हिंदी साहित्यिक डॉ.सुनील जाधव यांना मिळाला जपानचा आंतरराष्ट्रीय सन्मान…

     

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

नांदेड -ज्यांनी परदेशी भूमीवर राहूनही आपल्या राष्ट्रीय भाषेचा अभिमान बाळगला आहे असे हिंदी कल्चर सेंटर जपान आणि हिंदी की गुंज अंतरराष्ट्रीय पत्रिके द्वारा हिंदी साहित्यात योगदान दिलेल्या विविध लेखकांचा दरवर्षी सन्मान केला जातो. 2021 या वर्षी जगातील काही लोकप्रिय साहित्यिकांना आंतरराष्ट्रीय हिंदी के सेनानी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात हिंदीच्या प्रचार आणि साहित्यिक योगदानासाठी यशवंत महाविद्यालयाच्या हिंदी विभागात कार्यरत असलेले डॉ.सुनील गुलाबसिंग जाधव यांना हिंदी कल्चर सेंटर जपान आणि हिंदी की गुंज अंतरराष्ट्रीय पत्रिके चे अध्यक्ष रमा शर्मा यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय “हिंदी सेनानी सम्मान-२०२१”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानासाठी, प्राध्यापक, साहित्यिक मित्रांकडून अभिनंदन प्राप्त झाले.

ताजा खबरें