इराण हा असा देश आहे, जिथे शरिया कायद्याच्या कठोर नियमांनुसार धर्मावर आधारित सामाजिक कायदे लागू केले जातात. इराणी समाजात हिजाबसारख्या धार्मिक पोशाखांचे पालन अनिवार्य आहे. कपड्यांपासून रोजच्या पूजापाठापर्यंत, इराणमध्ये अनेक नियम कठोरतेने लागू असतात, आणि त्यांच्या उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा होते. शासन अशा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी सतत नजर ठेवते.
तथापि, रविवारी याच कट्टर देशातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे इराणच्या हिजाब क्रांतीची आठवण झाली. या व्हिडिओमध्ये एक महिला, आहौ दरायी, तीव्र मानसिक दबावाखाली निषेध दर्शविण्यासाठी फक्त अंतर्वस्त्र घालून युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या परिसरात फिरताना दिसली.
हिजाब क्रांतीची पुनरावृत्ती?
दोन वर्षांपूर्वी महसा अमिनी नावाच्या एका महिलेला ‘नीट हिजाब घातला नाही’ म्हणून इराणच्या तथाकथित मॉरलिटी पोलिसांनी अटक केली होती, ज्यातून मोठ्या प्रमाणात हिजाबविरोधातील आंदोलनाची सुरुवात झाली होती. त्याच घटनेचे प्रतिध्वनी पुनः उमटत आहेत असे दिसत आहे, आहौ दरायीच्या कृत्यामुळे.
In Iran, a woman who was accosted by the “morality police” for not wearing hijab removes her clothing & roams the streets in defiance. She has since been arrested by IRGC forces and forcibly disappeared. This is the brave face of true resistance. pic.twitter.com/HhbbEGhKlf
— Elica Le Bon الیکا ل بن (@elicalebon) November 2, 2024
आहौ दरायीच्या या साहसी कृतीने तिला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळाला. इराणसारख्या कट्टरवादी देशात हिजाब न घालण्यावर कडक कायदा आहे. त्यामुळे आहौ दरायीचे हे कृत्य सरकारच्या शिस्तपालनाला थेट आव्हान दिल्यासारखे आहे.
आहौ दरायीची गायब होतंय शंका
सुरक्षा रक्षकांनी आहौ दरायीला रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. तिला पकडून कारमध्ये बसवून थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर मनोरुग्णालयात पाठवण्यात आल्याचेही वृत्त आहे.
विरोधकांचे समर्थन
आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः मानवाधिकार संघटनांकडून, आहौ दरायीला समर्थन मिळाले आहे. अम्नेस्टी इंटरनॅशनलने इराणी अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे की तिची तात्काळ सुटका करावी आणि तिच्या हक्कांचे रक्षण करावे. या संस्थेच्या निवेदनानुसार, त्या महिलेला तिच्या कुटुंबाशी आणि वकिलांशी संपर्क साधण्याची परवानगी द्यावी, तसेच तिला कोणत्याही प्रकारे यातना दिल्या जाऊ नयेत.
घटना कुठे घडली?
आहौ दरायी हिची ही घटना तेहरानच्या इस्लामिक आझाद विद्यापीठात घडली. या कृत्यानंतरच्या व्हिडिओमध्ये, आहौ दरायीला सुरक्षा रक्षकांनी घेरून पकडून नेले होते, असा दावा करण्यात येतो.
इराणी सरकारची भूमिका
शासनाच्या दृष्टीकोनातून, हा प्रकार मानसिक आजाराचा भाग असल्याचे म्हटले जाते. युनिव्हर्सिटी प्रशासनाने तिला मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेली व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. इराणमधील काही सरकारी वृत्तांनुसार ती ‘गंभीर मानसिक दबाव’ अनुभवत होती.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या घटनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून वेगवेगळे दावे आणि आव्हाने समोर येत आहेत. इराणी महिलांच्या हक्कांबद्दलचा चर्चेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.