कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

या कारवाईमुळे पारोळा तालुक्यासह पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

या बाबतीत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील धुळ पिंप्री येथील रहिवासी आहे. ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेवर ब्लॉक करण्याचे एकूण एकूण ४ कामे प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आले होते. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सेवक कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय-२८) याने ग्रामविस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय-५८) यांच्यासाठी दोन टक्के आणि स्वतःसाठी एक टक्का याप्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी या संदर्भात जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने पळताडणीसाठी शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. यावेळी तडजोडी अंती १ लाख रुपये देण्यासाठी लाचेची रक्कम ठरली. त्यानुसार कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमोर १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे पारोळा पंचायत समिती कार्यालयात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला