शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची असल्यास मार्क्सवाद उपयोगी पडणार नाही या करिता ते बाबासाहेबांच्या शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथाचे वारंवार संदर्भ देत असत, पक्षाने आपल्या विचारधारेत भारतीय समाजव्यवस्थेनुरुप बदल करणे गरजेचे आहे अशी स्पष्ट भूमिका शरद पाटील यांनी घेवून मोठे जनआंदोलन उभे केले , प्रसंगी कम्युनिस्ट पक्षाशी द्रोह पत्करला . असे प्रतिपादन शरद पाटील यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक व शरद पाटील यांचे भाचे सुनील शिंदे यांनी केले.

जळगाव येथील काव्यारत्नवली चौक येथे कॉ. शरद पाटील जन्मशताब्दी निमित्त दिनांक १६ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यावक्ता म्हणून शिंदे बोलत होते. शिंदे यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की शरद पाटील यांनी आदिवासी लढे उभारून त्यांना न्याय मिळवून दिला, नामांतर प्रश्र्नी , कामगारांच्या प्रश्नी त्यांनी जेल सुध्दा उपभोगली, त्यांनी मार्क्स, फुले, आंबेडकर अशी नवी विचारसरणी मांडली, साहित्याच्या क्षेत्रात परंपरागत व्यवस्थेला छेद देणारे लेखन केले.

प्रसिध्द साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की शरद पाटील यांचा इथल्या एकूणच व्यवस्थेचा प्रचंड अभ्यास होता. बुद्ध, मार्क्स , वेद , संस्कृती, पुराणे, फुले, बाबासाहेब, वर्ग, जाती, स्त्रिदास्य, राम, कृष्ण या सारख्या अनेक विषयांवर त्यांनी नव्या दृष्टिकोनातून लेखन करून नवनवे मुद्ये वाचकांच्या समोर मांडलीत. त्यांच्या सोबत काम करतांना असे दिसून आले की ते सामान्य कार्यकर्त्यास बोलते करत, त्यास विचार करण्यास भाग पाडत त्यांच्या या भूमिकेने अनेक साहित्यिक, कार्यकर्ते उदयास आले. परिवर्तनवादी चळवळी पुढं नेण्याकरिता शरद पाटील यांचे विचार स्वीकारावेच लागतील असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी सांगितले की शरद पाटील हे लढावू बाण्याचे होते, नामांतराचा प्रश्न, आदिवासींच्या वनजमिनीचा प्रश्न, धरणग्रस्त लोकांचा प्रश्न, गिरणी कामगारांचा प्रश्न सोडविण्या करिता त्यांनी जी रस्त्यावरची लढाई लढली त्यात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही , पोलिसांचे दंडुके त्यांनी सहन केले, जेल मध्ये गेले पण आपल्या कार्यापासून ते दूर गेले नाही. त्यांच्या लिखाणाने, भाषणाने या देशात असंतोष निर्माण झाला, त्यांच्या कम्युनिस्ट पक्षात सुध्दा या संबंधाने मोठे वाद झाले, जाती अंताच्या , वर्ग संघर्ष च्या मुद्यावर त्यांनी पक्षाच्या भूमिकेस विरोध केल्याने शेवटी त्यांना पक्ष सोडावा लागला त्यांनी सत्यशोधक मार्क्सवादी हा नवा पक्ष काढून आपले कार्य कायम पुढं सुरू ठेवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सत्यजित साळवे, सूत्रसंचालन बापूराव पानपाटील तर आभार प्रदर्शन प्रा. प्रितीलाल पवार यांनी केले. सुरवातीस कॉ. शरद पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमास श्रोते मोठ्यासंख्येने हजर होते. सभासमाप्ती नंतर शरद पाटील जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला