नितीन गडकरी यांचा मोठा गौप्यस्फोट, विरोधकांनी मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती !

मुंबई – केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी केला आहे.

मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली, असंही ते म्हणाले आहेत. नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात उपस्थित लोकांना संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र मी ती नाकारली. मी नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा व्यक्ती आहे. मी अशा पक्षात आहे ज्याने मला जे हवे होते ते सर्व दिले आहे. कोणताही प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही.”

असं असलं तरी नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेत्याचे नाव उघड केले नाही किंवा घटनेची माहितीही दिली नाही. ते म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एका वरिष्ठ विरोधी पक्ष नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता.”

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. तर डीटीपी आणि जेडीयू सारख्या पक्षांच्या मदतीने आघाडी सरकार स्थापन करावे लागले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत

त्यावेळी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. त्यांनी एकत्रितपणे देशभरात निवडणुका लढवल्या. याचा परिणाम असा झाला की, एनडीएसाठी 400 चा आकडा पार करण्याचा दावा करणारा भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही झाले आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh