सावदा पोलीसांनी परप्रांतीयाला केली अटक 

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – मे. रावेर कोर्टा कडील प्रकरणातील पकड वॉरंट मधील आरोपी जयप्रकाश नारायण गुप्ता, रा. कुंडली बॉर्डर हरियाणा याने सावदा येथील केळी व्यापारी रितेश संतोष पाटील, रा.सावदा यांचेकडून 21 लाख रुपये किमतीची केळी माल विकत घेऊन त्याचे मोबदल्यात पैसे परत न करता चेक दिला होता सदरचा चेक हा बँकेत दाखल केल्यावर चेक बाउन्स झाल्या प्रकरणी तक्रारदार यांनी रावेर न्यायालयात दाद मागितली होती. सदर प्रकरणातील आरोपीतास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सावदा पोलीस स्टेशन यांनी सहाय्यक फौजदार बशीर तडवी व पोलीस हवलदार सिकंदर तडवी असे पथक हरियाणा येथे पाठवून सदर पथकाने आरोपीचा शोध काढून त्यास शिताफीने अटक करून हरियाणा येथून सावदा येथे आणले. नमूद आरोपितास मे. न्यायालयात हजर केले असता त्यास सबजेल जळगाव येथे पाठविले आहे.

केळी व्यापाराच्या प्रकरणांमध्ये प्रत्येक शेतकरी ट्रान्सपोर्ट चालक यांनी ओळखीच्या व विश्वासातील व्यापारी यांच्याशी केळीची देवाण-घेवाण करावी ज्या व्यापाऱ्यांशी व्यवहार करीत आहेत त्यांची खातर जमा करावी त्यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळता येतील असे आव्हान केले आहे