राज्य सरकारने सुरु केली स्वाधार योजना; ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 51 हजार

जळगाव – महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार योजना’ सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेवू शकत नाही त्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना 51,000 रुपये दिले जाणार आहेत. 11 वी, 12 वी, डिप्लोमा, व्यावसायीक आणि निम व्यवसायीक शिक्षण घेणाऱ्या तसेच राज्यातील गरीब व मध्यम वर्गीय अनुसूचित जाती व नव बौद्ध श्रेणीतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक लाभामधून विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी खर्च करू शकतात. या उपक्रमामुळे विद्यार्थी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून आपले भविष्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न पूर्ण करु शकणार आहेत.

महाराष्ट्रात राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘स्वाधार योजने’ अंतर्गत राज्यामधील अनुसूचित जाती (SC) आणि नव बौद्ध (NB) समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपात मदत केली जाणार आहे. सरकारतर्फे 10 वी, 12 वी, डिप्लोमा आणि व्यावसायीक कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दर वर्षी 51 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध सुविधांसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करून ही रक्कम ठरवण्यात आली आहे.

स्वाधार योजना काय आहे

1. योजनेचे नाव – स्वाधार योजना

2. श्रेणी – महाराष्ट्र सरकारी योजना

3. सुरु कोणी केली – महाराष्ट्र राज्य सरकार (समाज कल्याण विभाग)

4. कधी सुरु केली – 2024

5. उद्देश – गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत

6. लाभार्थी – महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवं बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी

7. आर्थिक लाभ – प्रतिवर्ष 51,000 रुपये

8. अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

9. अधिकृत वेबसाइट – sjsa.maharashtra.gov.in

स्वाधार योजनेचे फायदे

– महाराष्ट्र राज्यातील दुर्बळ व गरीब वर्गातील मुलांना शिक्षणासाठी च्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार.

– या योजने अंतर्गत गरीब वर्गातील मुलांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 51 हजार रुपये बँक खात्यामध्ये पाठविले जाणार.

– सरकारने सुरु केलेल्या या योजनेमध्ये राज्यातील (Swadhar Yojana 2024) बारावी व अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार.

– तसेच डिप्लोमा, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक कोर्स करणारे सुद्धा यामध्ये अर्ज करून लाभ मिळवू शकतात.

– राज्यामधील अनुसूचित जाती व नव बौद्ध श्रेणीच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजने अंतर्गत लाभ घेता येणार.

– विद्यार्थी प्रत्येक वर्षी भेटणाऱ्या आर्थिक लाभाचा त्यांच्या बोर्डिंग, लॉजिंग आणि इतर खर्चासाठी या रक्कमेचा उपयोग करू शकतात.

– राज्यातील सरकारने शारीरिक स्वरूपातील अपंगत्त्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

– विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेमधून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा उपयोग करून घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

असं आहे स्वाधार योजनेमध्ये मंजूर केलेल्या आर्थिक लाभाचे वर्गीकरण

सुविधा खर्च –

1. बोर्डिंग सुविधा – 28,000 रुपये

2. लॉजिंग सुविधा – 15,000 रुपये

3. मेडिकल आणि इंजिनियरिंग अभ्यासक्रमासाठी – 5,000 रुपये (अतिरिक्त)

4. विविध खर्च – 8,000 रुपये

5. इतर शाखांसाठी – 2,000 रुपये (अतिरिक्त)

एकूण रक्कम – 51,000 रुपये

आवश्यक पात्रता अशी आहे (Swadhar Yojana 2024) –

1. महाराष्ट्र स्वाधार योजनेस पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

2. या योजनेमध्ये फक्त गरीब व दुर्बल वर्गातील अनुसूचित जाती (SC), जमाती आणि नव बौद्ध (NB) श्रेणीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

3. ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्याच कुटुंबातील मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अकरावी, बारावी, डिप्लोमा, व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा हवा.

5. विद्यार्थ्यांला यामध्ये सहभागी होण्यासाठी मागील वर्गात कमीत कमी 60% मार्क असणे महत्त्वाचे आहे.

6. जे विद्यार्थी अपंग आणि दिव्यांग असतील त्यांना सहभागी होण्यासाठी त्यांना मागील वर्गात कमीत कमी 40% टक्केवारी असणे आवश्यक आहे.

7. यामध्ये अर्ज करून लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते असून ते आधारकार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.

8. महाराष्ट्राच्या बाहेरील स्थानिक विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.

9. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे.

10. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा उपयोग फक्त शैक्षणिक कालावधीनुसार जास्तीत जास्त 7 वर्ष घेता येईल.

स्वाधार योजनेच्या अटी –

1. विद्यार्थ्यांने अर्ज करताना फॉर्म अपूर्ण सोडू नये.

2. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे नसल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

3. अर्ज करण्यासाठी खोटी कागदपत्रे लावल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

4. एखाद्या विद्यार्थ्याचे मागील वर्गातील गुण 60% च्या खाली असतील तर तो विद्यार्थी अर्जसाठी पात्र राहणार नाही.

5. जे विद्यार्थी अनुसुचित जाती व नवं बौद्ध असून ते अपंग आहे त्यांना 40% गुणाप्रमाणे अर्ज करण्यास मान्यता आहे.

कोणकोणती कागदपत्रे आवश्यक –

1. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे आधारकार्ड (बँकेला लिंक असलेले)

2. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)

3. बँक खात्याचे पासबुकचे पहिले पान

4. ओळखपत्र

5. मोबाईल नंबर

6. पासपोर्ट आकाराचा फोटो

7. मागील वर्गातील गुणपत्रीका

8. अपंगत्व प्रमाणपत्र

9. रहिवासी दाखला

10. कुटुंबातील मुख्य सदस्याचे वार्षिक उत्पन्न दाखला

11. महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट

12. शपथपत्र

स्वाधार योजनेसाठी असं करा रजिस्ट्रेशन –

1. स्वाधार योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज्य सरकारकडून ऑनलाइन अर्ज प्रकिया अजून सुरु करण्यात आली नाही. परंतु या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता.

2. सर्व प्रथम तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

3. वेबसाइटवर गेल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल.

4. त्या होमपेजमध्ये तुम्हाला Swadhar Yojana Form PDF ची लिंक प्राप्त होईल.

5. त्या लिंकवर क्लिक करून फॉर्म (Swadhar Yojana 2024) डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.

6. फॉर्ममध्ये विचारली गेलेली सगळी माहिती काळजीपूर्वक भरा.

7. आवश्यक कागदपत्रे जोडा.

8. त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म आणि कागदपत्रे तुमच्या जिल्ह्यामधील समाज कल्याण विभागामध्ये जाऊन जमा करायचा आहे.

9. कार्यालयाकडून तुमचे सगळे कागदपत्रे तपासले जातील आणि तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.

10. अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करून आर्थिक लाभाचा उपयोग करून घेऊ शकता.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला