जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे होते :: जयसिंग वाघ

चोपडा :- भारतात १९५१ ला जनगणना केली असता फक्त अनुसूचित जाती, जमाती विषयक माहिती जाहीर करण्यात आली मात्र सर्वोच्य न्यायालयाने जातीगत जनगणना ही जातीला प्रोत्साहित करणारी असल्याने ती असंवैधानिक ठरते असे प्रतिपादन केले, या नंतर भारतात जातीगत जनगणना झालीच नाही . जातिगत जनगणना केल्याने प्रत्येक जातीचा सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक स्तर, राहणीमान व इतर बरीच माहिती मिळते व वंचित वा अप्रगत जातींच्या विकासार्थ विविध योजना तयार करणे शासनास सोपे होते व त्यातून जातीयता वाढत नाही तर जातींचा विकास होतो असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.

चोपडा येथील धनगर समाज मंदिरात २४ ऑगस्ट रोजी कम्युनिस्ट पार्टी तर्फे आयोजित ‘ जातिगत जनगणना परिषद ‘ मध्ये मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की ओबीसी समाजाचा अभ्यास करण्या करिता दर दहा वर्षांनी आयोग नेमणे आवश्यक असताना सरकार त्या संदर्भाने आयोग नेमत नाही त्यामुळे या समाजाचे मागासलेपण कळत नाही, अनुसूचित जाती, जमातीचे मागासलेपण न अभ्यासता त्यांचे आरक्षण कसे निष्क्रिय होईल या करिता सरकार व न्यायालय प्रयत्न करते सरकारची ही धोरणे’ कल्याणकारी राज्य’ या संकल्पनेला छेद देणारे आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले. जातिगत जनगणना करणे हे भाजपाला जसे नकोसे आहे तसेच काँग्रेसला सुध्दा नकोसे वाटते, काँग्रेसने सुध्दा जातिगत जनगणना केलेली नाही विशिष्ट जात समुहालाच सर्व प्रकारच्या नौकऱ्या व मोठे मोठे हुद्द्ये फार मोठ्याप्रमाणात दिलेले आहेत या मुळे एस. सी, एस. टी, ओबीसी समाज विकासा पासून दूर राहिला आहे. असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

परिषदेचे उदघाटन डॉ. नरेंद्र शिरसाट यांनी केले. त्यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हे धोरण ओबीसी समाजास सुध्दा लागू करावे, ५२ टक्के असणारा हा समाज २७ टक्के आरक्षणावर खुश होतो, क्रिमीलेयर मान्य करतो हे त्याच्यावर खरेतर अन्यायकारक आहे. अध्यक्षस्थानी कॉम्रेड अमृत महाजन होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत सरकार जातिगत जनगणना करण्या बाबत पूर्णतः उदासीन आहे, २०२१ मध्ये हे काम पूर्ण होणे गरजेचे होते पण सरकार या बद्दल काहीच बोलत नाही , जनताही गप्प आहे, सरकार खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करत आहे, विविध शासकीय कार्यालये बंद पाडत आहेत, अब्जावधी रुपयांचे कर्ज भांडवलदारांना माफ करीत आहे हे सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळ खिळे करणारे आहे . देशात आर्थिक, सामाजिक विषमता व जातीयता , धर्मांधता मोठ्याप्रमाणात वाढत आहे. या परिषदेत काँग्रसचे ज्येष्ठ नेते के. डी. चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संजीव शिरसाठ, डॉ. अयुब पिंजारी, हिलाल धनगर यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम पाटील , प्रास्ताविक डॉ. रुस्तुम तडवी, स्वागत पुंडलिक महाजन, परिचय संजीव शिरसाठ तर आभार डी. पी. साळुंखे यांनी केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh