जळगाव जिल्हा परिषद देणार १३५४ उमेदवारांना रोजगार!

जळगाव – यातील सर्वाधिक नियुक्त्या ग्रामपंचायतींमध्ये मिळणार आहेत. १ हजार ३५४ जागांपैकी प्रत्येक ग्रामपंचायतीला एका विद्यार्थ्यांला प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. १ हजार १४९ पदे ग्रामपंचायतींत भरली जाणार आहेत.

त्यामुळे बेरोजगार युवकांना गावात काम करण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता १२ वी पास असलेल्यांना दरमहा ६ हजार, आयटीआय झालेल्या उमेदवाराला कंपनीमध्ये ८ हजार, तर पदवी झालेल्यांना १० हजार रुपये मिळणार आहेत. पदवी व बारावी झालेल्या मुला- मुलींना पंचायत समिती, जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळणार असून, या दोन्ही कार्यालयांत जिल्ह्यात १९५ पदे आहेत. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या गावासाठी अथवा पं.स., जि.प.साठी अर्ज केला आहे, त्या कार्यक्षेत्रातील बीडीओ अथवा जि.प. कडून नियुक्त्या दिल्या जाणार आहेत, असे जि. प. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.