सावदा पोलीसांनी काही तासातच मोटरसायकल चोरट्याला केले जेरबंद !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – सावदा ता. रावेर येथील पोलीसांनी काही तासातच मोटरसायकल चोरट्याला अटक केल्याने सावदा पोलीसांचे कौतुक केले जाते आहे. या बाबत माहिती अशी की दि.17/08/2024 रोजी रात्री 9.30 ते दि.18/08/2024 रोजीच्या सकाळी 5.00 वाजेच्या दरम्यान रोझोदा ता.रावेर येथील कमलाकर एकनाथ पाटील वय-54 यांची 45000/- रुपये किमतीची बजाज डिस्कव्हर 125 सीसी लाल काळ्या रंगाची मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीवाचुन चोरुन नेली होती.

म्हणुन सावदा पोलीस स्टेशनला दि.18/08/2024 रोजी 22.39 वाजता भारतीय न्याय संहीती 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गेलेल्या मालाबाबत कोणतीही खात्रीलायक बातमी नसतांना सावदा पोलीस स्टेशन कडील स्टाफने गोपनीय माहीतीच्या आधारे चोरीस गेलेली मोटर सायकल व आरोपी याचा तपास करुन आरोपी नामे दिनेश लखन बारेला वय -36 वर्षे, रा. खयडी -बरडी प्रिंप्रीजवळ ता. भिकनगाव जि. खरगोन मध्यप्रदेश यास शिताफिने पकडुन त्याचेकडुन गेला माल मोटर सायकल हस्तगत केली आहे. सदरचा गुन्हा काही तासातच उघडकिस आणून उत्तम कामगीरी केलेली आहे. सदरची चांगली कामगिरी ही प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पो स्टे येथील नेमणुकीचे सफौ बशीर तडवी, पोह संजीव चौधरी, पोह विनोद तडवी, पोह मझहर पठाण, पोना निलेश बाविस्कर यांनी केली आहे.

ताजा खबरें