भावानेच केली लहान भावाची हत्या, झोपेत कुऱ्हाडने सपासप वार

भडगाव -: मोठया भावाने झोपेत असलेल्या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात घडली. विठ्ठल आनंदा पाटील असे ठार झालेल्या भावाचे नाव आहे तर अभिमन आनंदा पाटील असे आरोपी मोठया भावाचे नाव आहे. विठ्ठल आनंदा पाटील यांचा पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

मिळालेली माहितीनुसार, पिचर्डे येथे विठ्ठल आनंदा पाटील हे रात्री खळयातील मोकळया जागेत झोपलेले असताना त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील यांनी आपल्या लहान भावाचा निर्घृण खून केला. सकाळी लहान भाऊ खळयात गेले तेव्हा त्यांना विठ्ठल आनंदा पाटील मृतव्यवस्थेत आढळले असता त्यांनी लागलीच पोलिस पाटलांना ही माहिती दिली. पोलिस पाटील यांनी भडगाव पोलिस स्टेशनला कळवले व त्यानंतर भडगाव पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान तपास सुरू केल्यानंतर मोठया भावावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. भडगाव पोलिसांनी रुग्णवाहीकेसह घटनेस्थळी धाव घेत खून प्रकरणात वापरलेले हत्यार व आरोपीस देखील ताब्यात घेतले असून, मृतदेहास भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे, यावेळी पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक पवार उपस्थित होते. या घटनेचा पुढील तपास पीएसआय डोमाळे यांच्या नेतृत्वात भडगाव पोलीस करीत आहेत

jalgaonsandesh

jalgaonsandesh