देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप ; ‘परमबीर सिंह खरं बोलले, माझ्या अटकेसाठी सुपारी दिली गेली पण..’

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मविआच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव होता, असा खळबळजनक आरोप केला होता. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह जे बोलले ते खरं आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

फडणवीस म्हणाले, की परमबीर सिंह जे बोलले ते खरं आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. आम्ही त्याचा पर्दाफाश करु शकलो. मी, प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि अन्य काही नेते, यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली गेली होती. पण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे..

फडणवीस म्हणाले, की आमच्या अटकेसाठी चार वेळा प्रयत्न झाले. पण यांना काही मिळालं नाही. यांचे व्हिडीओ पुरावे सीबीआयला दिले. आजही आमच्याकडे अनेक व्हिडीओ पुरावे आहेत, असंही ते म्हणाले

काय होते परमबीर सिंह यांचे आरोप?

विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव होता, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या पाठीशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे होते, असंही ते एका माध्यमाशी बोलताना म्हणाले. ते म्हणाले, की गिरीश महाजन आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत सिलव्हर ओकवर बैठक झाली होती. तर मुंबई बँक प्रकरणात प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh