डंपर-खासगी बसच्या धडकेत 20 जखमी; वावडद्याजवळ गंभीर अपघात; थोडक्यात अनर्थ टळला

जळगाव – जळगाव-पाचोरा रोडवरील वावडदा गावाजवळील वळणावर खासगी बस व डंपर यांच्यात गुरुवारी (ता. १) सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. अपघातात लक्झरीतील २० प्रवाशी जखमी झाले असून, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१६ प्रवाशांना जबर दुखापत, तर चौघेही किरकोळ जखमी झाले आहे. जखमींमध्ये पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील १४ प्रवाशांचा समावेश आहे.

असा घडला अपघात

पाचोरा-जळगाव खासगी बस (एमएच १९, वाय ३३५९) पाचोरा येथून प्रवासी भरून जळगावकडे येत होती. वावडदाजवळ वळणावर पाचोऱ्याकडे जाणाऱ्या सुसाट डंपरने बसला जोरदार धडक दिली. यात खासगी बसमधील २० प्रवासी जखमी झाले, तर बसचे मोठे नुकसान झाले.

ग्रामस्थांची धाव

अपघात झाल्याची माहिती कळताच वावडदा ग्रामस्थ, शेतातील मजूर, तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. स्टिअरिंगमध्ये अडकलेल्या चालकाला प्रयत्नपूर्वक बाहेर काढले. अपघातात बसमधील २० प्रवासी जखमी झाले. त्यांना मिळेल त्या वाहनाने जळगाव जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जिल्‍हा रुग्णालय गाठून जखमींचे जबाब घेतले.

 

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh