भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या एपीआय पदी जनार्धन खंडेराव यांची नियुक्ती.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुका पोलीस स्टेशन चे पो नि बबनराव जगताप साहेब यांची सांगली येथे बदली झाली असता त्यांच्या जागी पो नि महेश गायकवाड साहेब यांनी पदभार स्विकारला त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन चे एपीआय विशाल पाटील साहेब यांची एल सी बी जळगाव येथे बदली झाली व तेथून सावदा ता रावेर येथे पदभार स्विकारला त्यामुळे भुसावळ तालुका येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) हे पद रिक्त होते. त्या जागेवर विदर्भातून यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यात आपल्या कार्याची छाप उमटविणारे जनार्धन एकनाथ खंडेराव साहेब यांची नियुक्ती झाली आहे.

कायदा व सुव्यवस्था स्थापीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जनार्धन खंडेराव साहेब यांनी सांगितले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh