बोदवड – सुनसगाव रस्त्यावर भिषण अपघात ! ओमनी गाडीवर चढला राखेचा डंपर; ५ जखमी 

प्रतिनीधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव गावालगत बायपास जाणाऱ्या नशिराबाद – बोदवड रस्त्यावर ओमनी गाडीवर राखेने भरलेला डंपर मागून चढल्याने ओमनी गाडीचा अक्षरशा चुराडा झाला असून सुनसगाव , गोंभी व नागरीकांनी धाव घेतल्याने पाच ही जणांचा जीव वाचला आहे.

या बाबत माहिती अशी की , दि. २ आँगस्ट रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान कोल्हाडी ता बोदवड येथील व बोदवड येथील पाच इसम ओमनी क्रमांक एम एच १९ बी जे ८५१७ या गाडीतून जळगाव येथे जात होते तर याच मार्गावर विल्हाळे ता भुसावळ येथून राखेचा डंपर क्रमांक एम एच ४५ – १२४५ जळगाव कडे जात होता.मात्र ओमनी गाडीच्या मागून येणारा डंपर चालकाने लांबूनच ब्रेक लावत येत डंपर ओमनी गाडीवर चढवले त्यामुळे ओमनी गाडीत असलेले रामदास मोरे , कैलास सुशीर ,प्रकाश सोनार ,निना सुशिर व कोल्हाडी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव बावीस्कर हे ओमनी गाडीत दाबले गेले. अपघात एवढा भिषण होता की ओमनी गाडीचा अक्षरशा चुराडा झाला होता. सुनसगाव, गोंभी येथील ग्रामस्थांनी व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी विशेष म्हणजे तरुणांनी ट्रँक्टर च्या सहाय्याने दोर व आसारी बांधून ओमनी गाडीतून प्रवाशांना बाहेर काढले या जखमी मध्ये काहीचे पाय फँक्चर झाले तर दोन जणांना कमरेला मार लागला आहे सर्व प्रवाशी रक्तबंबाळ झाले होते या बाबत भुसावळ तालुका पोलीसांना माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय जनार्धन खंडेराव व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली .जखमींना गावातील तरुणांनी सामान्य रुग्णालय जळगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून राखेचा डंपर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ओमनी गाडीत गँस किट असल्याने गँसचा वास येत होता त्यामुळे स्पोट होईल या कारणाने काही काळ धावपळ उडाली मात्र एकाने गँस कनेक्शन बंद केले त्यामुळे ओमनी गाडी डंपर मधून जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्यात आली. डंपर मालक बारामती येथील असल्याचे समजते. या मार्गावरुन राख व रेती चे डंपर सुसाट वेगाने धावत असतात त्यामुळे अपघात घडत असल्याचे सांगितले जाते आहे.

चौकट – रस्त्यावरुन जाणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घटना पाहताच १०८ रुग्णवाहिकेला फोन केला तसेच पोलीसांना माहिती कळवली पोलीस आले परंतु १०८ रुग्णवाहिका न आल्याने शेवटी खाजगी वाहनातून जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh