भुसावळ येथील राष्ट्रीय लोकन्यायालयात १०१ खटले निकाली.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – शहरातील अतिरिक्त व सत्र न्यायालयात झालेल्या लोक अदालत न्यायालयात दाखल व दाखल पुर्व मिळून १०१ खटले निकाली निघाले त्यापोटी १ कोटी ५८ लाख ६३ हजार १६९ रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली आहे.

भुसावळ न्यायालयात पॅनल व्दारे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या पॅनलने प्रमुख मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस बी हेडाऊ साहेब होते तर पंच म्हणून अॅड अभिजित मेने पॅनल क्रमांक १ कडे जिल्हा न्यायालयातील तडजोड युक्त खटले ठेवण्यात आले होते तसेच तालुक्यातील विविध बॅंकेकडील, विज वितरण, ग्रामपंचायत व बी एस एन एल कडील दाखल पुर्व खटले यांचे कामकाज पाहिले गेले.दुसऱ्या खटल्याचे प्रमुख मा.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती हेमा पाटील होत्या तर पंच म्हणून अॅड वैशाली पाटील होत्या पॅनल क्रमांक २ मध्ये दिवाणी न्यायालय क स्तर कडील प्रलंबित खटल्या पैकी तडजोड खटले ठेवण्यात आले होते. तसेच तिसऱ्या पॅनल प्रमुख तिसरे सह प्रमुख व दिवाणी व फौजदारी न्यायाधीश श्री एम आर बागडे साहेब हे होते. तर पंच म्हणून अॅड कैलास शेळके हे होते. पॅनल क्रमांक ३ कडे १ ले, २ रे, ३ रे ,४ थे ,५ वे सह दिवाणी व फौजदारी न्यायालय क स्तर न्यायालयातील तडजोड खटले ठेवण्यात आले होते. तसेच ४ थे पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती के एम पत्रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी भुसावळ तसेच २ रे, ३ रे, ४ थे, ५ वे तसेच रेल्वे कोर्ट या न्यायालयातील शुल्लक खटले च्या एकूण ५५ केसेस ठेवण्यात आल्या व सर्व निकाली काढण्यात आल्या.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती श्री एस बी हेडाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. लोक न्यायालय अदालतीत भुसावळ बार असोसिएशनचे सर्व सदस्य त्यात तुषार पाटील , सुशिल वर्गे, घोलप, नवाब अहमद, ए एम मलिक , नूर मोहम्मद, गजाननसिंग पाटील, उपाध्याय, मोघे, सिंग वकिल इत्यादी उपस्थित राहिले तसेच न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहून राष्ट्रीय लोकन्यायालयाचे कामकाज प्रभावीपणे पार पाडले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh