प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयाच्या मागे यज्ञेश नेमाडे रा.हनुमान नगर यांच्या शेतात गट नंबर ३१७/१ मध्ये दि.१८ जुलै रोजी १२ ते १४ वयोगटातील मुलाचा मृतदेह आढळला होता.या बाबत अकस्मात मृत्यू २५/ २०२४ नुसार नोंद करण्यात आली होती.या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या कडे या घटनेचा तपास होता.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले आणि अखेर या बेवारस मृतदेहाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून हा मुलगा अनिल कैलास आव्हाड (वय १२) रा.लोखंडी पूला जवळ, बाजार पेठ पोलीस स्टेशन असा असल्याचे भुसावळ तालुका पोलिसांनी सांगितले आहे.