प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – नशिराबाद – सुनसगाव रस्त्यावर फर्निचर च्या दुकानात दरोडा टाकून लाखोंचा लोखंडी माल लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत माहिती अशी की , दि.२० जुलै रोजी रात्री १:३० च्या सुमारास अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी नशिराबाद – सुनसगाव रस्त्यावर असलेल्या जयहिंद फर्निचर च्या गोडाऊन कम दुकानात आले असता या दुकानात जितेंद्र कुमार राम नरेश कुमार व पिंटू कुमार शिवचंद्र राम हे दोन कामगार झोपलेले होते त्यांना जिवे ठार करण्याची धमकी देत दोन्ही कामगारांचे हातपाय रुमालाने बांधले व चारचाकी वाहन दुकानाच्या दरवाजा जवळ लावून जवळपास पाच लाख रुपये किंमतीचा लोखंडी माल लंपास केला. त्यात बेडिंग मशिन चे १४ फुटाचे ब्लॉग किंमत ८० हजार रुपये , लोखंडी प्लेट किंमत ४५ हजार रुपये, पाॅवर प्रेस डाईज किंमत २ लाख रुपये , बेडींग मशीन ची सुरी किंमत ९० हजार रुपये व बेंडीग मशीन चा ब्लॉग किंमत ८० हजार रुपये असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा लोखंडी सामान अज्ञात चोरांनी लंपास केला आहे. या बाबत जयहिंद फर्निचर चे मनोज पंढरीनाथ पाटील यांनी नशिराबाद पोलीस स्टेशन ला अज्ञात दरोडेखोरां बद्दल गुन्हा दाखल केला असून एफ आय आर ०१२३ , भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ) कलम ३३१(४) , बी एन एस ३०७ , बी एन एस ३(५) नुसार नोंद करण्यात आली आहे पुढील तपास नशिराबाद पोलीस स्टेशन चे एपीआय रामेश्वर मोताळे करीत आहेत.
दरोड्याची घटना घडल्या नंतर दरोडेखोरांनी चोरीचा सामान असलेले चारचाकी वाहन सुनसगाव च्या दिशेने नेल्याचे सांगण्यात आले त्यामुळे सुनसगाव गावानजीक काही व्यावसायिकांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासणे गरजेचे आहे तसेच सुनसगाव – गोजोरा रस्त्यावर असलेल्या शिवशक्ती व श्री राम पेपर मील चे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे कुऱ्हा पानाचे गावाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केल्यास तपासाला दिशा मिळू शकते. या परिसरात अशा प्रकारे दरोडा पडण्याची पहिलीच घटना आहे.
या घटनास्थळी दि.२२ रोजी सकाळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी भेट देऊन फर्निचर दुकानात हातपाय बांधून ठेवलेले त्या दोन्ही कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे दुकानाचे भागीदार मनोज झोपे यांनी दै देशदूत शी बोलताना सांगितले तसेच तिन्ही भागीदारांनी मिळून आम्ही हा व्यवसाय सुरू केला असल्याचे सांगितले मात्र अतिशय महत्त्वाचा सामान चोरीला गेल्याने हतबल झालो असल्याचे सांगितले.