उत्तर प्रदेशात चंदीगड एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, दोघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात गुरुवारी दुपारी मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. चंदीगडहून गोरखपूरला जाणाऱ्या चंदीगड एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गावरील सर्व रेल्वेसेवा ठप्प झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. रुळावरुन घसरलेले डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

गोंडापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिलाही रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. गोंडा येथून बचाव पथक रवाना झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून तात्काळ मदतकार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh