जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परिक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी १८ ते ४० वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.

सदरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकॉटींग व ऑफीस ऑटोमेशन, इलेक्ट्रीसियन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे.

तरी इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी २५ जुलैपर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलुर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावे किंवा समक्ष भेटावे असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे. शाळेचा पत्ता – भायेगाव रोड, देगलूर ता. देगलूर जि. नांदेड मो. न. ९९६०९००३६९, ९४०३२०७१००, ७३७८६४११३६, ९४२०८४६८८७ –

jalgaonsandesh

jalgaonsandesh