.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.

यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे.

आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक मागणी केली आहे. याची एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे.

दरम्यान, आता प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. या योजनेचे स्वागत केलं जातं असताना त्यांनी ही मागणी केल्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील, असेही सांगितले जात आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे, असेही त्यांनी सांगितले.

डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने याबाबत अनेक अटी कमी केल्या आहेत. यामुळे महिलांनी मोठी गर्दी केली आहे.

राज्य सरकारने याची मुदत वाढवली आहे. यामुळे गर्दी झाल्याचे दिसून आले, तसेच अनेक ठिकाणी गैरवापर करून पैसे देखील जास्त घेतले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh