मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

 

मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

तर भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत केली.

पावसाळी सहलीसाठी लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये पुण्याच्या हडपसरमधील अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh