सावदा पोलीस स्टेशन चा पदभार विशाल पाटील यांच्या कडे.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – सावदा ता रावेर येथील पोलीस स्टेशन चे पोलीस सपोनि जिलींदर पळे यांची बदली झाली. असल्याने या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार असे बोलले जात असताना जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनि विशाल पाटील यांची सावदा पोलीस स्टेशन ला नियुक्ती करण्यात आली आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे सपोनि पदाची जबाबदारी सांभाळत असताना अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी उघड केले होते.

तर साकेगाव येथील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा शोध आणि मांडवेदिगर गावाजवळ भाचाने केलेली मामाची रस्तालूट या बाबत तपास चक्रे फिरवून आरोपींना अटक केली होती.