हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे मा . मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त फलक नुतनीकरण करून गोर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप राठोड यांच्या हस्ते मा . मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मा .मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या कार्यकाळात हरितक्रांती करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विदेशात अभ्यास दौरा करून हरितक्रांती घडून आणली त्यामुळे त्यांना हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

अशा दूरदृष्टी असलेल्या मा . मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फलकाचे नुतनीकरण करण्यात आले .

यावेळी गोर सेनेचे किनवट तालुका अध्यक्ष प्रदीप राठोड, खेडे, गाव विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पवार, धरमसिंग राठोड (कारभारी), गोर सेना शहर अध्यक्ष विनीत राठोड, गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड, राजू चव्हाण, राजू राठोड, श्याम राठोड, विकू चव्हाण, प्रा. वसंत राठोड, पाडू राठोड, डी एस पवार साहेब, वाय एम राठोड, विनोद राठोड, सदिंप पवार व गोरसेनेचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh