भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये नवीन कायदे बाबत माहिती.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये दि. १ जुलै २०२४ पासून नवीन कायदे बाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास गायकवाड यांनी तालुका पोलीस कर्मचारी यांना तसेच यावेळी पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या नागरिकांना सुध्दा माहिती दिली.

नविन कायदा व कलम कसे आहेत ते सांगीतले तसेच जिल्ह्यातील तीन पोलीस स्टेशन मध्ये नवीन कायदे नुसार गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दिपनगर, कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित उपस्थित होते.