घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे चाळीसगाव येथे असल्याची गोपनीय माहिती पोहेकाॅ प्रविण मांडोळे यांना मिळाली होती त्या बातमीच्या आधारावर एलसीबी चे पो नि बबन आव्हाड यांनी सपोनि विशाल पाटील, पोहेकाॅ कमलाकर बागुल, पोहेकाॅ संदिप पाटील, पोहेकाॅ प्रविण मांडोळे, पोहेकाॅ ईश्वर पाटील व चालक मोतीलाल चौधरी अशा टीम ला अमळनेर तालुक्यातील घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पाठवले हे पथक तात्काळ टाकळी प्र दे चाळीसगाव येथे जाऊन त्यांनी मोठ्या शिताफीने आरोपी किरण तुकाराम बारेला (सोलंकी) वय २७ मुळ रा.दुदखेडा ता सेंधवा जि बडवाणी मध्य प्रदेश ह मु टाकळी प्र दे चाळीसगाव याला ताब्यात घेतले असता त्याला सावखेडा ता अमळनेर येथील घरफोडी संदर्भात विचारणा केली असता सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्याने पाच महिन्यांपूर्वी सावखेडा ता अमळनेर येथे घरफोडी ची कबूली दिली असून त्याला पुढील कारवाई साठी अमळनेर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई डॉ महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव , श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, सुनिल नंदवलकर उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

ताजा खबरें