जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.५० लाखाचे बक्षीस मिळाले आहे. या अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.२५ लाखाचे तर ‘क’ वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.१० लाखाचे बक्षीस मिळाले आहे.

मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दि. १ मे,२०२३ ते ३० एप्रिल,२०२४ या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छतेबरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे.

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली. या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार असून, येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा