जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ जुन रोजी सकाळी १०:३० वाजता प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वसाधारण १० वी, १२ वी, सर्व पदवीधारक/आय टी आय सब ट्रेड धारक/सर्व डिप्लोमा धारक / असे एकूण १५० रिक्तपदे भरण्याविषयी कंपन्यांनी कळविलेले आहे.

रोजगार मेळाव्यात नमूद पात्रता धारक केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या

www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लॉय करण्यासाठी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग ईन करुन अप्लॉय करावा.

तसेच, ज्या उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. असे आवाहन सहायक आयुक्त रवीकुमार एम पंतम, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. मेळाव्याचे ठिकाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मेस हॉल, जळगाव आहे.