जळगावातील घटना ! मुलीला घेण्यासाठी शाळेत गेलेल्या महिलेला विहिरीत फेकले, रात्र काढली विहिरीत

जळगाव – जळगावातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. मुलीला घेण्यासाठी शाळेत गेलेल्या महिलेला विहिरीत ढकलून दिल्याची घटना आज २५ जून रोजी सकाळी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न.

येथे उघडकीस आली. सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली. दीपिका दीपक पाटील (वय २६, रा. नेहरूनगर)असे सदर महिलेचे नाव असून गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले. या घटनेचा एमआयडीसी पोलीस स्टेशन कसून तपास करीत आहेत.

जळगाव शहरातील नेहरूनगर परिसरात पती,मुलांसह वास्तव्यास असलेली दीपिका पाटील या दि. २४ जून रोजी दुपारी एक वाजेनंतर मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान रस्त्याने तिला अज्ञात महिलेने गुंगवून शिरसोली येथे घेऊन गेली. त्या महिलेने तिच्या डोक्यावरून हात फिरविल्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्यानंतर तास-दीड तासाने महिलेला गुंगीत असताना जाणवले की, ती पाण्यात असून एका विहिरीत आहे.

मात्र गुंगी असल्यामुळे तिला हालचाल करता येत नव्हती. यामुळे सोमवारची पूर्ण रात्र विहिरीत सदर महिलेने काढली. दुसरीकडे शाळेत सदर मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी तिच्या वडिलांना फोन केला. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची आई तिला शाळेत घ्यायला गेली आहे.(केसीएन) मग तिच्या वडिलांनी काकूला पत्नीला पाहण्यासाठी व मुलीला घेण्यासाठी पाठवले. दिवसभर व रात्रभर सदर महिलेचा परिवार शोध घेत होते. दरम्यान शिरसोली प्र.न.येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली.

त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले.गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले. त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले. त्यानंतर सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान सदर महिलेला गुंगवून विहिरीत टाकून देणारी ती महिला कोण आहे ? तिचा हेतू नेमका काय होता ? याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन शोध घेत आहेत. घटना मार्गावरील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम देखील पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी