18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली – निवडणुकीत NDA ने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. अशातच मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत. त्यानंतर सभापतीपदासाठीही निवडणूक होणार आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.

NDA कडे बहुमत

लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाले. या 18 व्या लोकसभेत एनडीएकडे 293 जागांसह बहुमत आहे. यामध्ये भाजपकडे 240 जागा आहेत. तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीकडे 234 जागा असून त्यापैकी काँग्रेसकडे 99 जागा आहेत.

PM मोदी घेणार खासदारकीची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्य आज सकाळी 11 वाजता खासदारकीची शपथ घेणार आहेत. सर्वप्रथम पंतप्रधान शपथ घेतील. त्यांच्यानंतर मंत्रिमंडळातील इतर सदस्य शपथ घेतील. यानंतर विविध राज्यांतील खासदार शपथ घेतील. सर्वप्रथम आसाम राज्यातील खासदार शपथ घेतील आणि शेवटी पश्चिम बंगालमधील खासदार शपथ घेतील. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळासह 280 नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी 264 नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत.

लोकसभेच्या सभापतीपदावरुन वाद 

भाजपचे नेते आणि सातवेळा खासदार भर्तृहरी महताब यांचे नाव लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. मात्र यावरुन वाद निर्माण झाला आहे. या वादाचा परिणाम अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिसून येण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, ‘भर्तृहरी महताब सलग सात वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत, त्यामुळे ते या पदासाठी पात्र उमेदवार आहेत.’

सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात होणार

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. सर्वप्रथम सर्व सदस्य मौन बाळगतील आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल. यानंतर लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह हे लोकसभेवर निवडून आलेल्या सदस्यांची यादी सभागृहाच्या टेबलवर ठेवतील. यानंतर पंतप्रधान मोदींना सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळाचे सदस्य आणि इतर खासदारांचा शपथविधी होईल. या शपथविधीनंतर लोकसभेचे कामकाज पार पडेल. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनात काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लागले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला