आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता केंद्र बनल्याने व आमदार मंगेश चव्हाण हेच या निवडणुकीतील हिरो ठरल्याने, महाविकास आघाडीच्या नेत्यांची पायाखालची वाळू सरकली आहे व विधानसभेचे त्यांना पराभव दिसू लागल्याने एका स्थानिक पुढाऱ्याने आमदारांना थेट गोळी घालण्याची भाषा केली आहे. या प्रकारामुळे महायुतीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी गुंडागिरीची भाषा करणाऱ्या नेत्याला अटक करण्याची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे कळते.

महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, मात्र हे धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते की फक्त आमदार मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून होते याची चर्चा सुरू असतानाच या आंदोलनातील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

लोकसभा निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्व विरोधक एक एकवटले होते व त्यांनी सर्व क्लुप्त्या , युक्त्या वापरून देखील त्यांना तालुक्यातून मताधिक्य देता आले नाही. व विधानसभेत आजच त्यांना पराभव दिसत असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांना विचलित करण्यासाठी व तालुक्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवण्याचा आरोप आता महायुतीच्या नेत्यांकडून होत आहे.

या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात टाकळी गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी बोलताना “माझ्या नादी लागशील तर पिस्तूलाने गोळी घालून मारून टाकेल रस्त्यावर” अशी जाहीर धमकी दिली. विशेष म्हणजे ही धमकी ज्याठिकाणी दिली त्या ठिकाणी समोरच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आहे. तसेच त्यावेळी मंचावर तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख व नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र यातील कुणीही या धमकीला विरोध तर सोडाच उलट टाळ्या वाजवून, हसून दाद दिलेली दिसली.

सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असणाऱ्या चाळीसगावमध्ये एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर विद्यमान आमदाराला गोळी घालण्याची जाहीर धमकी देण्याचा प्रकार प्रथमच घडला असून याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.

राज्यातील टॉप टेन मधील असलेले आमदार मंगेश चव्हाण यांची राज्यात आपल्या धडाकेबाज कामांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी १२ दिवस जेल भोगणारे, वारकरी, युवक, आशा, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, सर्व समाजघटकांना न्याय मिळवून देत प्रसंगी पदरमोड करून त्यांची कामे करणारे आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याच्या देण्यात आलेल्या या धमकीचा जाहीर निषेध.

हे चाळीसगाव आहे, इथे अशा विकृत राजकारणाला कधीच थारा मिळाला नाही आणि मिळणारही नाही. आणि अशा समाजविघातक प्रवृत्तीला पुढे करून जर कुणी राजकारण करणार असेल तर त्याला निवडणूकीत जागा दाखवण्याची ताकद देखील चाळीसगावच्या सुज्ञ जनतेमध्ये आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील