तुरखेडा येथील एका मुलीच्या उपचारासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटीलांनी घेतला पुढाकार

जळगाव – : तालुक्यातील तुरखेडा येथील एका सर्वसाधारण कुंटुबातील मुलीला ब्रेन ट्युमर झाला होता याबाबत गावातील सरपंच नितीन सपकाळे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना फोन करून सांगितले व लगेचच मुलीला उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आहे.

याबाबत सविस्तर असे कि 

तुरखेडा येथील श्री रवींद्र सपकाळे यांच्या मुलीला मागील 20 दिवसापासून ब्रेन ट्युमार झाल्यामुळे उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलेले होते परंतु मुलीची परिस्थिती क्रिटिकल असल्यामुळे येथील डॉक्टरांनी मुंबई येथे तात्काळ हलवण्यास सांगितले.

त्यावेळेस मुलीच्या वडिलांना एकच प्रश्न पडला की मुंबईच्या हॉस्पिटल चा खर्च कसा करावा. त्यानंतर त्यांनी गावातील सरपंच नितीन सपकाळे यांना याबाबत सांगितले असता नितीन सपकाळे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना फोन करून सर्व हकीगत सांगितली त्यानंतर लगेचच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंबई जाण्यासाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था करूण दिली. व तेथे राहण्याचा व खाण्याचा खर्चाची व्यवस्था देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी करून दिली. सरपंच नितीन सपकाळे तसेच मुलीचे नातेवाईक मुंबईला गेले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वताः जे जे हॉस्पिटल येथे जाऊन मुलीची तब्येतीची विचारपूस केली. याबाबत मुलीचे वडील रविंद्र सपकाळे, सरपंच नितीन सपकाळे, व गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे एका मुलीचे प्राण वाचले.